भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल, होऊ दे. पण तुम्हाला बालेकिल्ला दिलेला आहे मी, दाखवलेला आहे मी. जो तुमच्याच आतमध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार स्थिती. थॉटलेस अवेअरनेस. तुम्ही जर त्या किल्ल्यात बसलात तर कोणाची हिम्मत नाही तिथे पाय ठेवायची! हे लक्षात ठेवा. पण त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली. पाहिजे. श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास म्हणजे दूसरे तिसे काही नसून या सगळ्या दुष्टांचा मारा चुकवून आपल्या बालेकिल्ल्यात शिरला तो. म्हणून त्याला रणछोडदास म्हणायचे आणि हे सगले बसले बाहेर बोंबलत. बऱ्याच काळ्या विद्या सुरू झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. घाणेरडे लोक, घाणेरडे प्रकार करीत आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते तुम्हाला त्रास देतात हे मलाही माहिती आहे. छळतात. करून, करून करणार काय ? आम्ही बालेकिल्ल्यात आल्यावर बघून घेऊ म्हणावे. पण तुम्ही आपला बालेकिल्ला विसरलेला नाहीत. हे संरक्षणाचे स्थान कधीही मानवाला लाभलेले नव्हते. ते आज महामुश्किलीने तुम्हाला मिळालेले आहे, त्याचे दार उघडलेले आहे त्याच्यात बसा. बघते कोण तुम्हाला छळते आहे आणि कोठून तुम्हाला हे आजार होणार. या बालेकिल्ल्यात तुम्ही बसले पाहिजे. घरची घरची सगळी मंडळी विरोधात असली तरी त्यांच्या डोक्यावर टिच्चून बसले पाहिजे. कारय करता तुम्ही आपचे बघू या! सारा समाज जरी तुमच्या विरोधात असला तरी त्या बालेकिल्ल्यात तुम्हाला राहिलेच पाहिजे. आणि शेवटी सबंध विश्व जरी तुमच्या मागे लागले तरी या बालेकिल्ल्यात कोण येणार आहे आत! आणि ज्या दिवशी तो आतमध्ये आला त्या दिवशी तो ही पार झाला. ही अशी कमाल आहे याची. हा चमत्कार हातात आहे आपल्या. ओढा सगळ्यांना आपल्या बालेकिल्ल्यात. म्हणावे, मग बघू या! मग कुणाशी हात करणार! कारण सगळे एक आहेत हे महामूर्खांना कळले मग! हे सगळे महामूर्ख जे फिरत आहेत ते स्वत:चे नरक बनवत आहेत. आणि या वेळेला जर दडपले गेले नरकात तर उठू नाही देणार त्यांना! तेव्हा सावध रहा. असे घाबरण्यासारखे काहीच नाही. जर तुमची पूर्ण तयारी असेल तर या बालेकिल्ल्याचा मोठा किल्ला तयार करू या. पण कलीयुगात कोणाची हिम्मत नाही की समोर येऊन माझा मुकाबला करतील. पाठीमागून लहान लहान पोरांना धरून मारणारे हे हत्यारे लोक आहेत. तेव्हा तिकडे लक्ष देऊ नका. काहीही तुमचे वाकडे होणार नाही आणि कधीही होणार नाही. पण आपले छत्र मात्र डोक्यावर ठेवा. त्यांच्या कह्यात येऊ नका. या दादरला अशी दोन-चार मंडळी बसलेली आहेत आणि त्यांनी ही काळी विद्या इथे सुरू केलेली आहे. किती तरी लोकांच्या घरांची धूळधाण करून ठेवलेली आहे. मला माहिती आहे. मी मागेसुद्धा सांगत होते. आपल्याला माहिती आहे. त्यातले दोन गेले. सोडून गेले दादर. दोन अजून आहेत. त्यांना कोणाचे कल्याण करायचे नाही. स्वतःचेच पोट भरायचे आहे. पैसे कमवायचे आहेत. कमवा म्हणावे. सगळेच कमवतात पैसे! पण नाव देवाचे घेतले आहे त्यांनी! देवाच्या नावावरती पैसे कमवत आहेत त्याला हरकत नाही, पण देवाच्या नावावरती तुम्ही जर भूते विकू लागलात तर त्याला मात्र तुम्हाला क्षमा करणे कठीण जाईल. परमेश्वर कधीही अशा लोकांना क्षमा करणार नाही. पूर्वीची जी भूते होती ती भूतेच होती. डायरेक्टली भूतेच होती. पण अशा देवाच्या नावावर भूते विकणारी ही मंडळी, गंडे-दोरे हातात बांधायचे आणि तुमच्या घरात भूते पाठवायची. सर्रास हे धंदे चालले आहेत. आमच्या लंडनला तर इतके आहे, की मला आश्चर्य वाटले, की हे लंडन आहे की भूत नगरी आहे. तिथे पाय ठेवल्याबरोबर म्हटले नुसता भूतांचा सुळसुळाट! सगळी भूतंखेतं एवढी करून ठेवलेली आहे. ज्या ख्रिस्तांनी सांगितले होते 'कोणत्याही भूताच्या मार्गावर जाऊ नका. भूतांची कार्ये करू नका.' हे सगळे ख्रिश्चन स्मशानात जाऊन तिथून रक्त आणून, राख आणून हे धंदे करतात. प्लॅचेट काय करतात. म्हणजे ज्या गोष्टीला मना केलेले आहे त्याच करतात. हे ख्रिस्तांनी सांगितले तसे एक नानक साहेबांनी सांगितले. स्पष्टपणे इतके कोणी बोलले नव्हते या भूताखेतांबद्दल. आणि ते हे सगळे ख्रिश्चन लोक जे ब्रिटीश म्हणून मोठे फिरत होते आपल्याकडे, आता त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत हे सगळे. गल्लोगल्ली भूतांचे कारखाने उघडून ठेवलेले आहेत. यांच्या अकलेला काय म्हणावे मला समजत नाही. आणि मी भुताटकीच्या विरूद्ध बोलते तर लोकांना ते पटत नाही. फरक एवढाच आहे, की आपण लोक त्याला देवाचे नाव देतो, ते त्याला भूतांचेच नाव देतात. सैतान-क्राफ्ट म्हणतात, विचक्राफ्ट म्हणतात. आपल्यासारखा खोटेपणा नाही त्यांच्यात, पण इथून एक्सपोर्ट केलाय तुम्ही. पुष्कळ एक्सपोर्ट झाले आहेत. इथून गेलेत तिकडे, मोठमोठे भुतांचे राजे तिकडे होऊन. आणि काय पैसे कमावलेत! एकएका माणसाजवळ पस्तीस, पस्तीस रोल्स आहेत. एका रोल्स राइईसला आठ लाख रूपये किंमत पडते, दहा लाख रुपये किंमत पडते. हे तिथे इंग्लंडला सुरु झालेले आहे. आता हिंदुस्थानात काही कमी नाही तुमच्या. तुम्हाला धर्म हवा की अधर्म हवा हे तुमचे तुम्ही पाहिले, ठरविले पाहिजे. जर धर्म हवा असला तर खऱ्या गोष्टीवर उभे राहा. ज्यांना खोट्या गोष्टी हव्या असतात त्या माझ्याजवळ नाहीत. माझ्याजवळ चमत्कार नाहीत की तुम्ही म्हणालात, 'मला एक अंगठी द्या.' माझ्याजवळ मेडिटेन आहे. माझ्याजवळ, तुमच्याजवळ शक्ती घेण्याची, तुमच्या आतमधली परमेश्वराने एवढी संपत्ती दिलेली आहे ती उघडण्याची कला शिकवायची आहे मला. मी म्हणते एवढ्या अंगठ्या वाटतात हे लोक आपला हिंदुस्थानचा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करा तुम्ही. यांना पंतप्रधान करा सगळ्यांना अंगठ्या वाटतील. श्रीमंत लोकांनाच कशाला अंगठ्या वाटतात. तिकडे वाटा ना! आहेत आमच्या इकडे पुष्कळ गरीब लोक. गरीबांकडे लक्ष नाही या लोकांचे. श्रीमंतांच्या खिश्याकडे आहे आणि हे श्रीमंतसुद्धा मूर्खासारखे तिकडेच जाणार. असा हा प्रकार चाललेला आहे. आज ही दैन्यदशा या देशाला आलेली आहे त्याला कारण ही भूते आहेत, हे तुम्हाला माहिती नाही. तेव्हा अशा लोकांना थोड्याशा फायद्यासाठी मुळीच मदत करू नये आणि यांच्या दारात उभे राह नये. कोणी भुताटकीच्या गोष्टी केल्या तर त्यांच्या दारात उभे राह नये. कितीही म्हटलं तरी धर्मातच सगळे आहे. धर्मातच सगळे आहे, इथून तिथून लक्ष्मीपर्यंत जेवढे काही संसारात आहे ते सुद्धा धर्मातच आहे. आणि त्याच्या पलीकडचेसुद्धा धर्मातच आहे. सगळे धर्मातच आहे. सगळे धर्मानीच बनवलेले आहे. धर्माच्या पलीकडे काहीही नाही. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला सांगण्यासारखेही नाही. सात बाकीच्या पिढ्या आहेत. ते भोगायचे असले आणि मनुष्य योनीतून किड्यांच्या योनीत जायचे असले तर या लोकांच्या मार्गावर तुम्ही जा. तोंड उघडून या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे की हे सगळे जादूचे खेळ बंद करा. त्याबद्दल भिण्याची काही गरज नाही. आतली जादू झाली पाहिजे. आतमध्ये प्रकाश आला पाहिजे आणि त्याच्या आनंदात सगळीकडे ही बहरलेली जी फुले आहेत त्यांचा प्रकाश पसरला पाहिजे. म्हणजे हे चिखल जे आहे ते बदलून त्या ठिकाणी एक कमळाचे सरोवर निर्माण होईल. ही वेळ आलेली आहे. संबंध सृष्टी या वेळेला तयार आहे. पंचमहाभूते तुमच्या मदतीला उभी आहेत. तिकडे सगळे मोठे मोठे अवतारी पुरुष या कार्याला आशीर्वाद देत आहेत आणि सगळ्यांची ही पूर्ण तयारी आहे, की तुम्हाला काहीही लागले तरी आम्ही तयार आहोत. पर फक्त हे मानवाच्या हातात आहे, की हा निश्चय झाला पाहिजे, की आम्ही धर्मात आहोत की अधर्मात! आम्ही धर्माला उभे राहणार आहोत की अधर्माला उभे राहणार आहोत. धर्म तुम्ही पैशानी विकत घेऊ शकत नाही. परमेश्वराला तुम्ही बाजारात काढलेले आहे. हे धिंडवडे तुम्ही सगळे धर्माचे केलेले आहेत. साध्या भोळ्या लोकांना फसवून धर्माची ही विटंबना केलेली आहे त्याची पापं भोगलीच पाहिजेत. पर सगळ्यात मोठे पाप म्हणजे संतांना त्रास सुद्धा देणे. जे परमेश्वराच्या शोधात आहेत त्या लेकांना मार्गापासून च्युत करणे. याच्यापेक्षा मोठे पाप संसारात काही नाही आणि त्याची शिक्षा इतकी भयंकर आहे, की सांगण्यासारखी नाही तेव्हा अशा कार्यात कोणीही पडू नये. धर्म जितका सुंदर आहे, जितका मार्गदर्शक आहे, धर्म जितका प्रेम देणारा आहे, जितका मायाळू आहे, सर्वांना आपापसात घेणारा आहे, तितकाच धर्म जाज्वल्य आहे. तो जाळून टाकेल, पोळून टाकेल, संहार करून टाकेल सर्वांचा ! त्या धर्माची जशी शक्ति आहे तशी अग्निची आहे हे लक्षात ठेवा. या वेळेला जास्त बोकाळलेले दिसते आणखी जास्त या दादरला! कसले कसले रोग, कसले कसले त्रास आज आम्ही आपल्या आई, बहिण, मुलांना देत आहोत . आम्हीच देत आहोत. दूसरे कोणी देत नाही. कोणी मांजरी देत नाहीत आपल्याला त्रास. आम्ही माणसेच माणसाला देत आहोत. माणूसच माणसाचा गळा कापतो आहे. कोणी दुसरे येऊन कापत नाही तुमचे गळे. कारण माणसातच राक्षस घुसले आहेत आणि माणसातच भक्त आहेत. भक्तांचे गळे कापणे हेच राक्षसांचे कार्य आहे. जर ते केले नाही तर ते राक्षस कशाला! पण त्याहीपेक्षा बिकट अवस्था अशी आहे, की प्रत्येक संतांमध्ये राक्षस घुसलेला आहे. मी तरी काय करू! ज्याला आपला मुलगा करते त्याच्यात राक्षस घुसला, करू तरी काय मी! त्याला धड मारता येत नाही आणि जवळही घेता येत नाही. काय या आईची दुर्दशा ! आपल्या मुलाला भेटायला आले तर एक एक राक्षस डोक्यावर घेऊन बसलेले आहेत. आता मी काय करू! अरे ते राक्षस फेका डोक्यावरचे. कशाला उचलून धरलेत डोक्यावर. काय दिलंय तुम्हाला राक्षसांनी? ही धरा हरली तुमच्यापुढे! तो सूर्य हरला तुमच्यापुढे! त्या समुद्रानेसुद्धा अंग टाकले आहे की, 'संपलो बुवा या मानवाच्या मूर्खपणाला. ' संत माणसांना त्रास देणाऱ्या माणसाने लक्षात ठेवावे, की दोन-चार पैशासाठी जर त्यांनी एखाद्या संताला त्रास दिला तर याचा जाब आजच नाही, तर जन्मजन्मांतर पर्यंत त्यांना द्यावा लागणार आहे. मला हे ही माहिती आहे, की आज या समाजात अशी दोन-चार मंडळी येऊन बसलेली आहेत, पैसे खाऊ. त्रास देण्यासाठी ते इथे येऊन बसलेले आहेत. लक्षात ठेवावे. त्या राक्षसांची मीच आई आहे आणि तुमची ही आई मीच आहे. पण तुमच्या बचावासाठी यांना पुष्कळदा मारलेले आहे आणि आणखी मारणार आहे. काळजी करू नका. स्वत:चाच जीव आहे, पण मारणार आहे त्यांना मी. बघू दे! थोडीशी माणसे होतील त्यांच्यातील, पण बघू दे! पण तुम्ही त्यांच्या खेळण्यात आणि खेळवण्यात येऊ नका. खोट्या गोष्टींनी आपली पोटे भरत नाही. साऱ्या देशाचा नाश तर झालाच आहे, पण पुढल्या येणार्या पिढीचा नाश करू नका. मोठमोठाले जीव आता जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी नरकपुरी करू नका. त्यांच्या स्वागतासाठी काही तरी विशेष रचना करा. पृथ्वी सौंदर्यपूर्ण करा त्यांच्यासाठी. काय केले आहे तुम्ही आपल्या मुलांसाठी. आम्ही उभे आहोत. काय पाहिजे आहे ते मागा. देऊ, पण सुबुद्धी कोठून देणार आम्ही! आम्ही सुबुद्धी कोठून उसनी आणू तुमच्यासाठी. सुबुद्धी तुमची तुम्हालाच पाहिजे. तेवढी मात्र तुम्ही आणा. बाकी मेहनत आम्ही करायला तयार आहोत . तुमच्यात आहे ते. ते बीज तुमच्यातच आहे. अगदी खरी गोष्ट आहे. तुमच्यातच ते बीज आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. तो ज्यामुळे झाला ते तुमच्यात आहे. त्याला काही वाल्मिकी व्हायचे नव्हते. तेवढी सुबुद्धी नव्हती, पण डोक्यात आले 'दोन-चार पैशांसाठी मी माझा आत्मा मारतो आहे.' त्याच दिवशी त्यांनी हे ठरवले, त्याच दिवशी त्यांनी हा निश्चय केला की, 'झाले पुष्कळ केले हे. कोणासाठी करतोय मी ? माझ्यासाठी मी काय केलेले आहे?' हा विचार एकदा घ्या. 'मी माझ्यासाठी काय केलेले आहे?' तुमच्यासाठी मी तळमळत आहे इथे. माझा जीव तळमळतो आहे तुमच्यासाठी, क्षणोक्षणी. तुमच्यामध्ये दिवा लावायचा आहे. असा दिवा जो सर्व संसारात पसरला पाहिजे. या भारतातच तो दिवा लागणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आज . घाबरू नका. दोन-चार दिवसाचीच गोष्ट आहे. हे दिवस काढून घ्या. उद्या लहरीच्या माथ्यावर तुम्हीच जाऊन बसणार आहात, हे लक्षात ठेवा. एकच कारण आहे, आमच्या भारतात सगळे खराब आहे असे मानतो आम्ही, तरी एक कारण आहे, आईचा अपमान करायला आम्ही अजून शिकलेलो नाही. आईच्या इज्जतीची आम्हाला अजून इज्जत आहे. जोपर्यंत हे तुमच्यात राहील तोपर्यंत या देशाचे स्थान कधीही बदलणार नाही. ही भांग भूमी आहे की योग भूमी आहे ते तुम्ही ठरवायला नको. ते परमेश्वरानेच ठरविलेले आहे आधी आणि त्या देशात जन्मलेले लोक तुम्ही स्वत:ला कमी समजता का खायला नाही म्हणून! अरे, तुम्हीच लोक असे राह शकता. त्या लंडनचे लोक थोडेच राह शकतात असे? त्यांना जर एवढेसे कमी-जास्त झाले तर लढायला बसतात. हे तुम्ही लोक खरोखर सन्यासी लोक आहात. कुठेही झोपतात, कुठेही खातात आणि मजेत राहतात. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आपल्या आईची बेइज्जत करायची असली तर करा आणि मग भोगा त्याची फळे! आईबरोबर रुसता येते. बरोबर आहे, पण मानवात जर सगळ्यात उच्च नातं कोणते असेल तर ते आईचे आहे आणि तिच्यातच तुम्हाला देवाचे दर्शन होते आणि या देशातली आई आहे ती एवढे सहन करून घेते. तिकडे काही नाही. मुल दहा वर्षाचे झाले की काढून टाकतात घरातून. आणि मुलांनी घरात काम नाही केले तर त्यांच्याकडून पैसे घेते जेवणाचे. अशी आई तिकडे राहते. मुलगा मेला तरी चालेल. कारण त्याच्यावर दोन पैसे खर्च करायला नको कारण तिला लिपस्टिकसाठी पैसे पाहिजेत. नव्वद वर्षाच्या म्हातारीला. आज तुम्ही आपल्या आईची काय इज्जत करून ठेवली आहे, ते बघा! इथेच अशी आई जन्माला येते. भारतासारखी आई कुठेच नाही जगात. तुम्ही जाऊन बघून या आणि तिथे हे हाल करून ठेवेलेले आहेत ! हलणार तुमचा धर्म मग! धर्म हलवला नाही पाहिजे तर आपल्या आईची बेइज्जती करायचा जो काही मनसुबा आहे तो सोडून टाका आता. ते पैसे वर्गैरे परत करा. सगळे माहिती आहे आम्हाला. आम्ही काय तुम्हाला लोकांना ओळखत नाही का? बरं, काही असले तरी या जन्मात आता पार व्हायचे आधी लाडू खाऊ या, मग बघू, त्याच्यापेक्षा आईला काय आनंद वाटणार आहे ? सगळा स्वयंपाक सुंदरपणे करून ठेवला आणि मुलावर रागवायचे म्हणजे काय हे! पण करावे लागते. तेव्हा आता जेवायला बसा आरामात. आरामात जेवायला बसा आणि प्रेमाचे अमृत तुमच्याकडून वाहू दे सगळ्या जगामध्ये आणि साऱ्या जगाची दिशा अमृत मिळवून घ्या. बदलायला बसलोय आपण! काय लहान-लहान गोष्टी घेऊन बसलेले आहात! जगाच्या इतिहासात या गोष्टी जाणार आहेत. लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांनी मूर्खपणा केलेला आहे. एकेकाची नावे जगाच्यासमोर जाणार आहेत आणि लोक थुंकणार आहेत त्यांच्यावर. त्यांच्या मुलांवर थुंकतील, त्यांच्या मुलांच्या मुलांवर थूंकतील, हेच ते घाणेरडे लोक त्यांनी हे घाणेरडे काम केलेले आहे. आपले कार्य उज्वल करा. आपला चेहरा उजळ करा. मुलांना हेच द्यायचे आहे. ध्यानात जा. डोळे मिटा, असल में जो आज भाषण देना था उसको मराठी भाषा के सिवा मज़ा नहीं आता। ये वीरपूर्ण भाषा जो है ये हिंदी में जमती नहीं अपने को। मराठी में जमता है। इसलिए माफ कीजिए कि मराठी में बातचीत की। हिंदी में बातचीत नहीं की इसलिए माफ कीजिए। ये जरा किसीके लिए कहना था। वह आपके लिए था भी नहीं। भरकटलेले लोक असतात. डोळे मिटा. नाव वरगैरे घेऊ नये. सध्या या वेळेला नाव घेऊ नका. पुष्कळ वर्गैरे बरेच केलेले आहेत. काय आहे ? कोण गुरू आहेत, कोण गुरू नाहीत हे कसे ओळखायचे ? गुरू याला काहीतरी जाणीव असते आतमध्ये. ते कसे समजायचे ? ते व्हायब्रेशन्सने कळते. हातावर येणाऱ्या या चैतन्य लहरींनी कळते की कोण गुरू आहेत आणि कोण नाहीत. तेव्हा ते आधी शिकून घ्या. मग गुरू करा. आधीच काय करता वेड्यासारखे. डोळे तर घ्या आधी. गुरू बिरू तिकडे ठेवा. नमस्कार करून सगळ्यांना बाजूला ठेवा. सध्या तुम्ही तुमचे गुरू आणि आम्ही तुमची आई. ---------------------- 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page0.txt भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. तुमच्या मनाला दुखापत होईल, होऊ दे. पण तुम्हाला बालेकिल्ला दिलेला आहे मी, दाखवलेला आहे मी. जो तुमच्याच आतमध्ये आहे. तो म्हणजे निर्विचार स्थिती. थॉटलेस अवेअरनेस. तुम्ही जर त्या किल्ल्यात बसलात तर कोणाची हिम्मत नाही तिथे पाय ठेवायची! हे लक्षात ठेवा. पण त्या किल्ल्यात बसण्याची सवय लावली. पाहिजे. श्रीकृष्णाला रणछोडदास म्हणतात. रणछोडदास म्हणजे दूसरे तिसे काही नसून या सगळ्या दुष्टांचा मारा चुकवून आपल्या बालेकिल्ल्यात शिरला तो. म्हणून त्याला रणछोडदास म्हणायचे आणि हे सगले बसले बाहेर बोंबलत. बऱ्याच काळ्या विद्या सुरू झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. घाणेरडे लोक, घाणेरडे प्रकार करीत आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते तुम्हाला त्रास देतात हे मलाही माहिती आहे. छळतात. करून, करून करणार काय ? आम्ही बालेकिल्ल्यात आल्यावर बघून घेऊ म्हणावे. पण तुम्ही आपला बालेकिल्ला विसरलेला नाहीत. हे संरक्षणाचे स्थान कधीही मानवाला लाभलेले नव्हते. ते आज महामुश्किलीने तुम्हाला मिळालेले आहे, त्याचे दार उघडलेले आहे त्याच्यात बसा. बघते कोण तुम्हाला 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page1.txt छळते आहे आणि कोठून तुम्हाला हे आजार होणार. या बालेकिल्ल्यात तुम्ही बसले पाहिजे. घरची घरची सगळी मंडळी विरोधात असली तरी त्यांच्या डोक्यावर टिच्चून बसले पाहिजे. कारय करता तुम्ही आपचे बघू या! सारा समाज जरी तुमच्या विरोधात असला तरी त्या बालेकिल्ल्यात तुम्हाला राहिलेच पाहिजे. आणि शेवटी सबंध विश्व जरी तुमच्या मागे लागले तरी या बालेकिल्ल्यात कोण येणार आहे आत! आणि ज्या दिवशी तो आतमध्ये आला त्या दिवशी तो ही पार झाला. ही अशी कमाल आहे याची. हा चमत्कार हातात आहे आपल्या. ओढा सगळ्यांना आपल्या बालेकिल्ल्यात. म्हणावे, मग बघू या! मग कुणाशी हात करणार! कारण सगळे एक आहेत हे महामूर्खांना कळले मग! हे सगळे महामूर्ख जे फिरत आहेत ते स्वत:चे नरक बनवत आहेत. आणि या वेळेला जर दडपले गेले नरकात तर उठू नाही देणार त्यांना! तेव्हा सावध रहा. असे घाबरण्यासारखे काहीच नाही. जर तुमची पूर्ण तयारी असेल तर या बालेकिल्ल्याचा मोठा किल्ला तयार करू या. पण कलीयुगात कोणाची हिम्मत नाही की समोर येऊन माझा मुकाबला करतील. पाठीमागून लहान लहान पोरांना धरून मारणारे हे हत्यारे लोक आहेत. तेव्हा तिकडे लक्ष देऊ नका. काहीही तुमचे वाकडे होणार नाही आणि कधीही होणार नाही. पण आपले छत्र मात्र डोक्यावर ठेवा. त्यांच्या कह्यात येऊ नका. या दादरला अशी दोन-चार मंडळी बसलेली आहेत आणि त्यांनी ही काळी विद्या इथे सुरू केलेली आहे. किती तरी लोकांच्या घरांची धूळधाण करून ठेवलेली आहे. मला माहिती आहे. मी मागेसुद्धा सांगत होते. आपल्याला माहिती आहे. त्यातले दोन गेले. सोडून गेले दादर. दोन अजून आहेत. त्यांना कोणाचे कल्याण करायचे नाही. स्वतःचेच पोट भरायचे आहे. पैसे कमवायचे आहेत. कमवा म्हणावे. सगळेच कमवतात पैसे! पण नाव देवाचे घेतले आहे त्यांनी! देवाच्या नावावरती पैसे कमवत आहेत त्याला हरकत नाही, पण देवाच्या नावावरती तुम्ही जर भूते विकू लागलात तर त्याला मात्र तुम्हाला क्षमा करणे कठीण जाईल. परमेश्वर कधीही अशा लोकांना क्षमा करणार नाही. पूर्वीची जी भूते होती ती भूतेच होती. डायरेक्टली भूतेच होती. पण अशा देवाच्या नावावर भूते विकणारी ही मंडळी, गंडे-दोरे हातात बांधायचे आणि तुमच्या घरात भूते पाठवायची. सर्रास हे धंदे चालले आहेत. आमच्या लंडनला तर इतके आहे, की मला आश्चर्य वाटले, की हे लंडन आहे की भूत नगरी आहे. तिथे पाय ठेवल्याबरोबर म्हटले नुसता भूतांचा सुळसुळाट! सगळी भूतंखेतं एवढी करून ठेवलेली आहे. ज्या ख्रिस्तांनी सांगितले होते 'कोणत्याही भूताच्या मार्गावर जाऊ नका. भूतांची कार्ये करू नका.' हे सगळे ख्रिश्चन स्मशानात जाऊन तिथून रक्त आणून, राख आणून हे धंदे करतात. प्लॅचेट काय करतात. म्हणजे ज्या गोष्टीला मना केलेले आहे त्याच करतात. हे ख्रिस्तांनी सांगितले तसे एक नानक साहेबांनी सांगितले. स्पष्टपणे इतके कोणी बोलले नव्हते या भूताखेतांबद्दल. आणि ते हे सगळे ख्रिश्चन लोक जे ब्रिटीश म्हणून मोठे फिरत होते आपल्याकडे, आता त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत हे सगळे. गल्लोगल्ली भूतांचे कारखाने उघडून ठेवलेले आहेत. यांच्या अकलेला काय म्हणावे मला समजत नाही. आणि मी भुताटकीच्या विरूद्ध बोलते तर लोकांना ते पटत नाही. फरक एवढाच आहे, की आपण लोक त्याला देवाचे नाव देतो, ते त्याला भूतांचेच नाव देतात. सैतान-क्राफ्ट म्हणतात, विचक्राफ्ट म्हणतात. आपल्यासारखा खोटेपणा नाही त्यांच्यात, पण इथून एक्सपोर्ट केलाय तुम्ही. पुष्कळ एक्सपोर्ट झाले आहेत. इथून गेलेत तिकडे, मोठमोठे भुतांचे राजे तिकडे 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page2.txt होऊन. आणि काय पैसे कमावलेत! एकएका माणसाजवळ पस्तीस, पस्तीस रोल्स आहेत. एका रोल्स राइईसला आठ लाख रूपये किंमत पडते, दहा लाख रुपये किंमत पडते. हे तिथे इंग्लंडला सुरु झालेले आहे. आता हिंदुस्थानात काही कमी नाही तुमच्या. तुम्हाला धर्म हवा की अधर्म हवा हे तुमचे तुम्ही पाहिले, ठरविले पाहिजे. जर धर्म हवा असला तर खऱ्या गोष्टीवर उभे राहा. ज्यांना खोट्या गोष्टी हव्या असतात त्या माझ्याजवळ नाहीत. माझ्याजवळ चमत्कार नाहीत की तुम्ही म्हणालात, 'मला एक अंगठी द्या.' माझ्याजवळ मेडिटेन आहे. माझ्याजवळ, तुमच्याजवळ शक्ती घेण्याची, तुमच्या आतमधली परमेश्वराने एवढी संपत्ती दिलेली आहे ती उघडण्याची कला शिकवायची आहे मला. मी म्हणते एवढ्या अंगठ्या वाटतात हे लोक आपला हिंदुस्थानचा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करा तुम्ही. यांना पंतप्रधान करा सगळ्यांना अंगठ्या वाटतील. श्रीमंत लोकांनाच कशाला अंगठ्या वाटतात. तिकडे वाटा ना! आहेत आमच्या इकडे पुष्कळ गरीब लोक. गरीबांकडे लक्ष नाही या लोकांचे. श्रीमंतांच्या खिश्याकडे आहे आणि हे श्रीमंतसुद्धा मूर्खासारखे तिकडेच जाणार. असा हा प्रकार चाललेला आहे. आज ही दैन्यदशा या देशाला आलेली आहे त्याला कारण ही भूते आहेत, हे तुम्हाला माहिती नाही. तेव्हा अशा लोकांना थोड्याशा फायद्यासाठी मुळीच मदत करू नये आणि यांच्या दारात उभे राह नये. कोणी भुताटकीच्या गोष्टी केल्या तर त्यांच्या दारात उभे राह नये. कितीही म्हटलं तरी धर्मातच सगळे आहे. धर्मातच सगळे आहे, इथून तिथून लक्ष्मीपर्यंत जेवढे काही संसारात आहे ते सुद्धा धर्मातच आहे. आणि त्याच्या पलीकडचेसुद्धा धर्मातच आहे. सगळे धर्मातच आहे. सगळे धर्मानीच बनवलेले आहे. धर्माच्या पलीकडे काहीही नाही. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुम्हाला सांगण्यासारखेही नाही. सात बाकीच्या पिढ्या आहेत. ते भोगायचे असले आणि मनुष्य योनीतून किड्यांच्या योनीत जायचे असले तर या लोकांच्या मार्गावर तुम्ही जा. तोंड उघडून या गोष्टीबद्दल बोलायला पाहिजे की हे सगळे जादूचे खेळ बंद करा. त्याबद्दल भिण्याची काही गरज नाही. आतली जादू झाली पाहिजे. आतमध्ये प्रकाश आला पाहिजे आणि त्याच्या आनंदात सगळीकडे ही बहरलेली जी फुले आहेत त्यांचा प्रकाश पसरला पाहिजे. म्हणजे हे चिखल जे आहे ते बदलून त्या ठिकाणी एक कमळाचे सरोवर निर्माण होईल. ही वेळ आलेली आहे. संबंध सृष्टी या वेळेला तयार आहे. पंचमहाभूते तुमच्या मदतीला उभी आहेत. तिकडे सगळे मोठे मोठे अवतारी पुरुष या कार्याला आशीर्वाद देत आहेत आणि सगळ्यांची ही पूर्ण तयारी आहे, की तुम्हाला काहीही लागले तरी आम्ही तयार आहोत. पर फक्त हे मानवाच्या हातात आहे, की हा निश्चय झाला पाहिजे, की आम्ही धर्मात आहोत की अधर्मात! आम्ही धर्माला उभे राहणार आहोत की अधर्माला उभे राहणार आहोत. धर्म तुम्ही पैशानी विकत घेऊ शकत नाही. परमेश्वराला तुम्ही बाजारात काढलेले आहे. हे धिंडवडे तुम्ही सगळे धर्माचे केलेले आहेत. साध्या भोळ्या लोकांना फसवून धर्माची ही विटंबना केलेली आहे त्याची पापं भोगलीच पाहिजेत. पर सगळ्यात मोठे पाप म्हणजे संतांना त्रास सुद्धा देणे. जे परमेश्वराच्या शोधात आहेत त्या लेकांना मार्गापासून च्युत करणे. याच्यापेक्षा मोठे पाप संसारात काही नाही आणि त्याची शिक्षा इतकी भयंकर आहे, की सांगण्यासारखी नाही तेव्हा अशा कार्यात कोणीही 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page3.txt पडू नये. धर्म जितका सुंदर आहे, जितका मार्गदर्शक आहे, धर्म जितका प्रेम देणारा आहे, जितका मायाळू आहे, सर्वांना आपापसात घेणारा आहे, तितकाच धर्म जाज्वल्य आहे. तो जाळून टाकेल, पोळून टाकेल, संहार करून टाकेल सर्वांचा ! त्या धर्माची जशी शक्ति आहे तशी अग्निची आहे हे लक्षात ठेवा. या वेळेला जास्त बोकाळलेले दिसते आणखी जास्त या दादरला! कसले कसले रोग, कसले कसले त्रास आज आम्ही आपल्या आई, बहिण, मुलांना देत आहोत . आम्हीच देत आहोत. दूसरे कोणी देत नाही. कोणी मांजरी देत नाहीत आपल्याला त्रास. आम्ही माणसेच माणसाला देत आहोत. माणूसच माणसाचा गळा कापतो आहे. कोणी दुसरे येऊन कापत नाही तुमचे गळे. कारण माणसातच राक्षस घुसले आहेत आणि माणसातच भक्त आहेत. भक्तांचे गळे कापणे हेच राक्षसांचे कार्य आहे. जर ते केले नाही तर ते राक्षस कशाला! पण त्याहीपेक्षा बिकट अवस्था अशी आहे, की प्रत्येक संतांमध्ये राक्षस घुसलेला आहे. मी तरी काय करू! ज्याला आपला मुलगा करते त्याच्यात राक्षस घुसला, करू तरी काय मी! त्याला धड मारता येत नाही आणि जवळही घेता येत नाही. काय या आईची दुर्दशा ! आपल्या मुलाला भेटायला आले तर एक एक राक्षस डोक्यावर घेऊन बसलेले आहेत. आता मी काय करू! अरे ते राक्षस फेका डोक्यावरचे. कशाला उचलून धरलेत डोक्यावर. काय दिलंय तुम्हाला राक्षसांनी? ही धरा हरली तुमच्यापुढे! तो सूर्य हरला तुमच्यापुढे! त्या समुद्रानेसुद्धा अंग टाकले आहे की, 'संपलो बुवा या मानवाच्या मूर्खपणाला. ' संत माणसांना त्रास देणाऱ्या माणसाने लक्षात ठेवावे, की दोन-चार पैशासाठी जर त्यांनी एखाद्या संताला त्रास दिला तर याचा जाब आजच नाही, तर जन्मजन्मांतर पर्यंत त्यांना द्यावा लागणार आहे. मला हे ही माहिती आहे, की आज या समाजात अशी दोन-चार मंडळी येऊन बसलेली आहेत, पैसे खाऊ. त्रास देण्यासाठी ते इथे येऊन बसलेले आहेत. लक्षात ठेवावे. त्या राक्षसांची मीच आई आहे आणि तुमची ही आई मीच आहे. पण तुमच्या बचावासाठी यांना पुष्कळदा मारलेले आहे आणि आणखी मारणार आहे. काळजी करू नका. स्वत:चाच जीव आहे, पण मारणार आहे त्यांना मी. बघू दे! थोडीशी माणसे होतील त्यांच्यातील, पण बघू दे! पण तुम्ही त्यांच्या खेळण्यात आणि खेळवण्यात येऊ नका. खोट्या गोष्टींनी आपली पोटे भरत नाही. साऱ्या देशाचा नाश तर झालाच आहे, पण पुढल्या येणार्या पिढीचा नाश करू नका. मोठमोठाले जीव आता जन्माला येत आहेत. त्यांच्यासाठी नरकपुरी करू नका. त्यांच्या स्वागतासाठी काही तरी विशेष रचना करा. पृथ्वी सौंदर्यपूर्ण करा त्यांच्यासाठी. काय केले आहे तुम्ही आपल्या मुलांसाठी. आम्ही उभे आहोत. काय पाहिजे आहे ते मागा. देऊ, पण सुबुद्धी कोठून देणार आम्ही! आम्ही सुबुद्धी कोठून उसनी आणू तुमच्यासाठी. सुबुद्धी तुमची तुम्हालाच पाहिजे. तेवढी मात्र तुम्ही आणा. बाकी मेहनत आम्ही करायला तयार आहोत . तुमच्यात आहे ते. ते बीज तुमच्यातच आहे. अगदी खरी गोष्ट आहे. तुमच्यातच ते बीज आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला. तो ज्यामुळे झाला ते तुमच्यात आहे. त्याला काही वाल्मिकी व्हायचे नव्हते. तेवढी सुबुद्धी नव्हती, पण डोक्यात आले 'दोन-चार पैशांसाठी मी माझा आत्मा मारतो आहे.' त्याच दिवशी त्यांनी हे ठरवले, त्याच दिवशी त्यांनी हा निश्चय केला की, 'झाले पुष्कळ केले हे. 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page4.txt कोणासाठी करतोय मी ? माझ्यासाठी मी काय केलेले आहे?' हा विचार एकदा घ्या. 'मी माझ्यासाठी काय केलेले आहे?' तुमच्यासाठी मी तळमळत आहे इथे. माझा जीव तळमळतो आहे तुमच्यासाठी, क्षणोक्षणी. तुमच्यामध्ये दिवा लावायचा आहे. असा दिवा जो सर्व संसारात पसरला पाहिजे. या भारतातच तो दिवा लागणार आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल आज . घाबरू नका. दोन-चार दिवसाचीच गोष्ट आहे. हे दिवस काढून घ्या. उद्या लहरीच्या माथ्यावर तुम्हीच जाऊन बसणार आहात, हे लक्षात ठेवा. एकच कारण आहे, आमच्या भारतात सगळे खराब आहे असे मानतो आम्ही, तरी एक कारण आहे, आईचा अपमान करायला आम्ही अजून शिकलेलो नाही. आईच्या इज्जतीची आम्हाला अजून इज्जत आहे. जोपर्यंत हे तुमच्यात राहील तोपर्यंत या देशाचे स्थान कधीही बदलणार नाही. ही भांग भूमी आहे की योग भूमी आहे ते तुम्ही ठरवायला नको. ते परमेश्वरानेच ठरविलेले आहे आधी आणि त्या देशात जन्मलेले लोक तुम्ही स्वत:ला कमी समजता का खायला नाही म्हणून! अरे, तुम्हीच लोक असे राह शकता. त्या लंडनचे लोक थोडेच राह शकतात असे? त्यांना जर एवढेसे कमी-जास्त झाले तर लढायला बसतात. हे तुम्ही लोक खरोखर सन्यासी लोक आहात. कुठेही झोपतात, कुठेही खातात आणि मजेत राहतात. आईचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आपल्या आईची बेइज्जत करायची असली तर करा आणि मग भोगा त्याची फळे! आईबरोबर रुसता येते. बरोबर आहे, पण मानवात जर सगळ्यात उच्च नातं कोणते असेल तर ते आईचे आहे आणि तिच्यातच तुम्हाला देवाचे दर्शन होते आणि या देशातली आई आहे ती एवढे सहन करून घेते. तिकडे काही नाही. मुल दहा वर्षाचे झाले की काढून टाकतात घरातून. आणि मुलांनी घरात काम नाही केले तर त्यांच्याकडून पैसे घेते जेवणाचे. अशी आई तिकडे राहते. मुलगा मेला तरी चालेल. कारण त्याच्यावर दोन पैसे खर्च करायला नको कारण तिला लिपस्टिकसाठी पैसे पाहिजेत. नव्वद वर्षाच्या म्हातारीला. आज तुम्ही आपल्या आईची काय इज्जत करून ठेवली आहे, ते बघा! इथेच अशी आई जन्माला येते. भारतासारखी आई कुठेच नाही जगात. तुम्ही जाऊन बघून या आणि तिथे हे हाल करून ठेवेलेले आहेत ! हलणार तुमचा धर्म मग! धर्म हलवला नाही पाहिजे तर आपल्या आईची बेइज्जती करायचा जो काही मनसुबा आहे तो सोडून टाका आता. ते पैसे वर्गैरे परत करा. सगळे माहिती आहे आम्हाला. आम्ही काय तुम्हाला लोकांना ओळखत नाही का? बरं, काही असले तरी या जन्मात आता पार व्हायचे आधी लाडू खाऊ या, मग बघू, त्याच्यापेक्षा आईला काय आनंद वाटणार आहे ? सगळा स्वयंपाक सुंदरपणे करून ठेवला आणि मुलावर रागवायचे म्हणजे काय हे! पण करावे लागते. तेव्हा आता जेवायला बसा आरामात. आरामात जेवायला बसा आणि प्रेमाचे अमृत तुमच्याकडून वाहू दे सगळ्या जगामध्ये आणि साऱ्या जगाची दिशा अमृत मिळवून घ्या. बदलायला बसलोय आपण! काय लहान-लहान गोष्टी घेऊन बसलेले आहात! जगाच्या इतिहासात या गोष्टी जाणार आहेत. लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांनी मूर्खपणा केलेला आहे. एकेकाची नावे जगाच्यासमोर जाणार आहेत आणि लोक थुंकणार आहेत त्यांच्यावर. त्यांच्या मुलांवर थुंकतील, त्यांच्या मुलांच्या मुलांवर थूंकतील, हेच ते घाणेरडे लोक त्यांनी हे घाणेरडे काम केलेले आहे. आपले कार्य उज्वल करा. 19750121_Bholepana ani nirvicharitecha killa_Mumbai_M_TC.pdf-page5.txt आपला चेहरा उजळ करा. मुलांना हेच द्यायचे आहे. ध्यानात जा. डोळे मिटा, असल में जो आज भाषण देना था उसको मराठी भाषा के सिवा मज़ा नहीं आता। ये वीरपूर्ण भाषा जो है ये हिंदी में जमती नहीं अपने को। मराठी में जमता है। इसलिए माफ कीजिए कि मराठी में बातचीत की। हिंदी में बातचीत नहीं की इसलिए माफ कीजिए। ये जरा किसीके लिए कहना था। वह आपके लिए था भी नहीं। भरकटलेले लोक असतात. डोळे मिटा. नाव वरगैरे घेऊ नये. सध्या या वेळेला नाव घेऊ नका. पुष्कळ वर्गैरे बरेच केलेले आहेत. काय आहे ? कोण गुरू आहेत, कोण गुरू नाहीत हे कसे ओळखायचे ? गुरू याला काहीतरी जाणीव असते आतमध्ये. ते कसे समजायचे ? ते व्हायब्रेशन्सने कळते. हातावर येणाऱ्या या चैतन्य लहरींनी कळते की कोण गुरू आहेत आणि कोण नाहीत. तेव्हा ते आधी शिकून घ्या. मग गुरू करा. आधीच काय करता वेड्यासारखे. डोळे तर घ्या आधी. गुरू बिरू तिकडे ठेवा. नमस्कार करून सगळ्यांना बाजूला ठेवा. सध्या तुम्ही तुमचे गुरू आणि आम्ही तुमची आई.